'फिरकी' : पटकथेला फारच ‘ढील’, ‘पतंगबाजी’ला बसवते ‘खिळ’!
कथा पडद्यावर सादर करताना पटकथेला फारच ‘ढील’ देण्यात आली आहे. त्यामुळे पडद्यावरील या ‘पतंगबाजी’चा पाहिजे तसा प्रभाव पडत नाही. कल्पना चांगली असली, तरी कथेचा जीव फारच छोटा आहे. त्यामुळे त्याची पटकथा बंदिस्त कशी होईल याकडे लक्ष देण्याची अधिक गरज होती. शिवाय चित्रपटाची मांडणी लक्षात घेता दिग्दर्शनातील नवखेपण जाणवत राहतं.......